पुंडलीक पूजा करी । विधि षोडश उपचारी ॥१॥ देखोनियां त्याचा भावों । उभा वैकुंठीचा रावों ॥२॥ बुका अर्पीं तुळशीमाळा । केशर चंदनाचा टिळा ॥३॥ निळा म्हणे स्थिरावला । देखोनि भक्तांतें भुलला ॥४॥
पुंडलीक पूजा करी – संत निळोबाराय अभंग – ३७५