चिमणें ठाण कटीं कर । मूर्ती सांवळी सकुमार ॥१॥ होय डोळियां पारणें । पाहतां दिसे राजसवाणें ॥२॥ जडोनि ठेले सनकादिक । चरणी ठेऊनियां मस्तक ॥३॥ निळा म्हणे ओवाळिती । संत:प्राणांचिया ज्योती ॥४॥