महिमा याचा चतुर्मुखा – संत निळोबाराय अभंग – ३७३

महिमा याचा चतुर्मुखा – संत निळोबाराय अभंग – ३७३

महिमा याचा चतुर्मुखा ।
न करवेचि लेखा वर्णितां ॥१॥
सनकादिकाहि नित्य येती ।
पूजा करिती देवभक्ता ॥२॥
सुरवर आणि मुनिजन ।
संतसज्जन नित्य स्तविती ॥३॥
निळा म्हणे सकळही तीथें ।
होतीं कृतार्थ दर्शनें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

महिमा याचा चतुर्मुखा – संत निळोबाराय अभंग – ३७३