पंढरीये पांडुरंग । भोंवता संग संतांचा ॥१॥ मिळवूनियां संतमेळा । मध्यें सांवळा शोभत ॥२॥ एकला एकचि पुंडलिका । जोडी त्रैलोक्या पुरविली ॥३॥ निळा म्हणे न सरे तरी । अदयापि वरी तैसेंचि ॥४॥