बरें झालें शरण गेलों । संतीं लाविलों निज सोयी ॥१॥ म्हणती पंढरीचा हाट । करी बोभाट हरीनामें ॥२॥ येईल तो वरावरी । धरील श्रीहरी हदयेंसी ॥३॥ निळा म्हणे एकचि खेपे । खंडती पापें सकळहीं ॥४॥