चिमणाचि देखिला परि हा वाड झाला ।
गगनहि फांकला प्रकाश वरी ॥१॥
भरोनियां दाही दिशा कोंदाटला ।
पाताळा वरिही गेला पदांकु याचा ॥२॥
स्वर्ग माळा अंगी लेईला सुढाळ ।
कान्हो चक्रचाळ पंढरीचा ॥३॥
निळा म्हणे दिसे ईटेच्या नेहटीं ।
परी हा व्यापुनी सुष्टीं येथें उभा ॥४॥