सांगतों हे मनीं धरा । हित करा आपुलें ॥१॥ जा रे पंढरीसी आधीं कृपानिधीं भेटेल ॥२॥ अवघींच सुखे अलौकिकें । देईल एके दर्शनें ॥३॥ निळा म्हणे रिध्दी सिध्दी । मुक्तिपदीं लागती ॥४॥