सांगतों हे मनीं धरा – संत निळोबाराय अभंग – ३६५
सांगतों हे मनीं धरा ।
हित करा आपुलें ॥१॥
जा रे पंढरीसी आधीं कृपानिधीं भेटेल ॥२॥
अवघींच सुखे अलौकिकें ।
देईल एके दर्शनें ॥३॥
निळा म्हणे रिध्दी सिध्दी ।
मुक्तिपदीं लागती ॥४॥
सांगतों हे मनीं धरा ।
हित करा आपुलें ॥१॥
जा रे पंढरीसी आधीं कृपानिधीं भेटेल ॥२॥
अवघींच सुखे अलौकिकें ।
देईल एके दर्शनें ॥३॥
निळा म्हणे रिध्दी सिध्दी ।
मुक्तिपदीं लागती ॥४॥