पंढरपुरा जाऊं चला – संत निळोबाराय अभंग – ३६४

पंढरपुरा जाऊं चला – संत निळोबाराय अभंग – ३६४

पंढरपुरा जाऊं चला ।
भेटों रुक्माई विठ्ठल ॥१॥
जन्ममरणाचें खंडन ।
अवलोकितां दृष्टीं चरण ॥२॥
पुंडलिका वंदूनियां लागों विठोबाच्या पायां ॥३॥
निळा म्हणे घेऊनी कडे नेतील वैकुंठा रोकडें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पंढरपुरा जाऊं चला – संत निळोबाराय अभंग – ३६४