देवा भक्तांचा सोहळा । वाचें गाती वेळोवेळां ॥१॥ म्हणती धन्य पंढरपुर । पुंडलीक मुनीश्वर ॥२॥ चंद्रभागा पदयतीर्थ । वेणुनादीं जन कृतार्थ ॥३॥ निळा म्हणे पांडुरंगा । भेटी तापत्रयभंगा ॥४॥