कैवल्याचा गाभा । व्यापूनियां ठेला नभा ॥१॥ तो हा सगुण वेषधारी । उभा चंद्रभागे तीरीं ॥२॥ धुंडिती पुराणें । वेदश्रुती ज्याकारणें ॥३॥ निळा म्हणे अवघे देव । ज्याचे म्हणविताती अवयव ॥४॥