पुंडलिकें आणिला घरां । त्रेलोक्यसोयरा कुटुंबाळू ॥१॥ सोळा सहस्त्र आत:पुरे कन्या कुमरे दास दासी ॥२॥ गाई गोधनाचे वाडे । गोपाळ सवंगडे समवेत ॥३॥ निळा म्हणे वस्ती दाट । केली वैकुंठ पंढरी ॥४॥