गरुड आणि हनुमंत । पुढें सेवेंसी तिष्ठत ॥१॥ उभा वैकुंठनिवासी । देव येती दर्शनासी ॥२॥ महाद्वारीं गरुडध्वज । गगनीं झळके तेज:पुंज ॥३॥ निळा म्हणे कथा कीर्ति । संत सन्मुख नाचती ॥४॥