संत निळोबाराय अभंग

कंसे बैसोनियां सभेसी – संत निळोबाराय अभंग ३६

कंसे बैसोनियां सभेसी – संत निळोबाराय अभंग ३६


कंसे बैसोनियां सभेसी ।
विडा मांडिला पैंजेसी ।
म्हणे जो वधील बाळकासी ।
जाऊनियां गोकुळा ॥१॥
त्यासी देईन हें अर्धराज्य ।
न करीं अन्यथा आपुली पैज ।
जया सांधेल हें काज ।
तेणें विलंब न करावा ॥२॥
भगिनी पुतना प्रधानरासी ।
ऐकतांची उठियेली अति आवेशी ।
म्हणे जाऊनियां गोकुळाशी ।
निर्दाळीन कुमर नंदाचा ॥३॥
आज्ञा घेऊनियां ते त्वरित ।
विष स्तनामाजी भरित ।
म्हणे पाजूनियां कृष्णनाथ ।
करीन घात शस्त्रेंविण ॥४॥
घेऊनियां बाळलेणी ।
मनगटीं बांधिली खेळणी ।
जिवती वाघनखें माळा मणी ।
आंगडे टोपडें बाळंतविडा ॥५॥
मग सुखासनी विराजित ।
दासी परिचारिका वेष्टित ।
येऊिनियां गोकुळा आंत ।
यशोदेगृहीं प्रवेशली ॥६॥
निळा म्हणे नवल कथा ।
वर्तेल ते येथें आतां ।
पूतना पावेल सायोज्यता ।
श्रीकृष्णनाथदर्शने ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कंसे बैसोनियां सभेसी – संत निळोबाराय अभंग ३६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *