कौलें पिकली परलोक पेंठ । हें भूवैकुंठ पंढरी ॥१॥ नाम मुद्रा खरें नाणें । घेणेंदेणें लाभवरी ॥२॥ ब्रम्हानंदे भरिलीं पोतीं । प्रेमें उथळती सीगवरी ॥३॥ निळा म्हणे जाऊं हाटा । करुं सांठा न सरेसा ॥४॥