कौलें पिकली परलोक – संत निळोबाराय अभंग – ३५९
कौलें पिकली परलोक पेंठ ।
हें भूवैकुंठ पंढरी ॥१॥
नाम मुद्रा खरें नाणें ।
घेणेंदेणें लाभवरी ॥२॥
ब्रम्हानंदे भरिलीं पोतीं ।
प्रेमें उथळती सीगवरी ॥३॥
निळा म्हणे जाऊं हाटा ।
करुं सांठा न सरेसा ॥४॥
कौलें पिकली परलोक पेंठ ।
हें भूवैकुंठ पंढरी ॥१॥
नाम मुद्रा खरें नाणें ।
घेणेंदेणें लाभवरी ॥२॥
ब्रम्हानंदे भरिलीं पोतीं ।
प्रेमें उथळती सीगवरी ॥३॥
निळा म्हणे जाऊं हाटा ।
करुं सांठा न सरेसा ॥४॥