जाईन म्हणतांचि पंढरपुरा – संत निळोबाराय अभंग – ३५८

जाईन म्हणतांचि पंढरपुरा – संत निळोबाराय अभंग – ३५८

जाईन म्हणतांचि पंढरपुरा ।
कळिकाळा दरारा उपजे मनीं ॥१॥
यमधर्माचिया दंडासी चुकला ।
आणि पूज्यमान झाला तिहीं लोकां ॥२॥
विधी म्हणे तया निषेधुची नाहीं ।
कर्माकर्मप्रवाही न पडेचि तो ॥३॥
निळा म्हणे तेणें आनंदवुनी सकळा ।
नेलें आपुल्या कुळा वैकुंठासी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जाईन म्हणतांचि पंढरपुरा – संत निळोबाराय अभंग – ३५८