झाली कीर्तनाची दाटी । चंद्रभागे वाळुवंटीं ॥१॥ संत गर्जती आनंदें । हरिची नामें नाना छंदें ॥२॥ टाळ मृदंग झणत्कार । नामें कोंदलें अंबर ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । झाला सुलभ हरिभक्तांसी ॥४॥