झाली कीर्तनाची दाटी – संत निळोबाराय अभंग – ३५७
झाली कीर्तनाची दाटी ।
चंद्रभागे वाळुवंटीं ॥१॥
संत गर्जती आनंदें ।
हरिची नामें नाना छंदें ॥२॥
टाळ मृदंग झणत्कार ।
नामें कोंदलें अंबर ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
झाला सुलभ हरिभक्तांसी ॥४॥
झाली कीर्तनाची दाटी ।
चंद्रभागे वाळुवंटीं ॥१॥
संत गर्जती आनंदें ।
हरिची नामें नाना छंदें ॥२॥
टाळ मृदंग झणत्कार ।
नामें कोंदलें अंबर ॥३॥
निळा म्हणे वैकुंठवासी ।
झाला सुलभ हरिभक्तांसी ॥४॥