देखतांचि यातें दिठी – संत निळोबाराय अभंग – ३५६
देखतांचि यातें दिठी । पळता कोटी पापांच्या ॥१॥ जेंवि उगवतांचि रवी । अंधकार न दावी मुख पुढें ॥२॥ जन्ममरणयात्रा फिटे । लाजती गोमटे अभ्यास ॥३॥ निळा म्हणे महिमा ऐसा । पंढरीनिवासा भेटतां ॥४॥