देखतांचि यातें दिठी – संत निळोबाराय अभंग – ३५६
देखतांचि यातें दिठी ।
पळता कोटी पापांच्या ॥१॥
जेंवि उगवतांचि रवी ।
अंधकार न दावी मुख पुढें ॥२॥
जन्ममरणयात्रा फिटे ।
लाजती गोमटे अभ्यास ॥३॥
निळा म्हणे महिमा ऐसा ।
पंढरीनिवासा भेटतां ॥४॥
देखतांचि यातें दिठी – संत निळोबाराय अभंग – ३५६
देखतांचि यातें दिठी ।
पळता कोटी पापांच्या ॥१॥
जेंवि उगवतांचि रवी ।
अंधकार न दावी मुख पुढें ॥२॥
जन्ममरणयात्रा फिटे ।
लाजती गोमटे अभ्यास ॥३॥
निळा म्हणे महिमा ऐसा ।
पंढरीनिवासा भेटतां ॥४॥