अगाध महिमा पंढरीचा – संत निळोबाराय अभंग – ३५५
अगाध महिमा पंढरीचा ।
काय तो वाचा कवळेल ॥१॥
येती यात्रे मुक्त होती ।
जे या देखती विठठला ॥२॥
नलगे दुजें तपसाधन ।
घडतां स्नान चंद्रभागे ॥३॥
निळा म्हणे भूमीवरी ।
क्षेत्र हें पंढरी वैकुंठ ॥४॥
अगाध महिमा पंढरीचा ।
काय तो वाचा कवळेल ॥१॥
येती यात्रे मुक्त होती ।
जे या देखती विठठला ॥२॥
नलगे दुजें तपसाधन ।
घडतां स्नान चंद्रभागे ॥३॥
निळा म्हणे भूमीवरी ।
क्षेत्र हें पंढरी वैकुंठ ॥४॥