जाऊनियां भीमातटीं । नाचों वाळवंटी पंढरिये ॥१॥ होतील लाभाचिया कोटी । पहातां दृष्टी विठठला ॥२॥ भुक्ति मुक्ति आपुल्या सुखें । येती हरिखें सामोया ॥३॥ निळा म्हणे परमार्थ धणी । होईल आयणी फिटोनी ॥४॥