चंद्रभागे करितां स्नान । होती पातकी पावन ॥१॥ पुंडलिकासी नमस्कार । करितां पूर्वजां उध्दार ॥२॥ वेणुनादीं काला वांटी । तुप्ती पूर्वजां वैकुंठीं ॥३॥ निळा म्हणे पिंडदान । दक्षिणगया अधिष्ठान ॥४॥