तिहीं लोकीं फुटलीं हांक । वैकुंठलोकापर्यंत ॥१॥ भेटों गेला पुंडलिकांसी । हदयनिवासी जगाचा ॥२॥ दोषियां पापियां उध्दरीत । आणि हाकांरित भाविकां ॥३॥ निळा म्हणे ठेवुनी हात । कटावरी तिष्ठत विटे उभा ॥४॥