तिहीं लोकीं फुटलीं – संत निळोबाराय अभंग – ३५१
तिहीं लोकीं फुटलीं हांक ।
वैकुंठलोकापर्यंत ॥१॥
भेटों गेला पुंडलिकांसी ।
हदयनिवासी जगाचा ॥२॥
दोषियां पापियां उध्दरीत ।
आणि हाकांरित भाविकां ॥३॥
निळा म्हणे ठेवुनी हात ।
कटावरी तिष्ठत विटे उभा ॥४॥
तिहीं लोकीं फुटलीं हांक ।
वैकुंठलोकापर्यंत ॥१॥
भेटों गेला पुंडलिकांसी ।
हदयनिवासी जगाचा ॥२॥
दोषियां पापियां उध्दरीत ।
आणि हाकांरित भाविकां ॥३॥
निळा म्हणे ठेवुनी हात ।
कटावरी तिष्ठत विटे उभा ॥४॥