नावडे पंढरी । कथा करी दारोदारीं ॥१॥ नको त्याचें संभाषण । वाटे भेटीसवें शीण ॥२॥ सांगे ब्रम्हज्ञान वरी नाहीं प्रेम तें अंतरी ॥३॥ निळा म्हणे पोटभरु । उगेंचि करिती गुरुगुरु ॥४॥