नावडे पंढरी – संत निळोबाराय अभंग – ३४९
नावडे पंढरी ।
कथा करी दारोदारीं ॥१॥
नको त्याचें संभाषण ।
वाटे भेटीसवें शीण ॥२॥
सांगे ब्रम्हज्ञान वरी नाहीं प्रेम तें अंतरी ॥३॥
निळा म्हणे पोटभरु ।
उगेंचि करिती गुरुगुरु ॥४॥
नावडे पंढरी ।
कथा करी दारोदारीं ॥१॥
नको त्याचें संभाषण ।
वाटे भेटीसवें शीण ॥२॥
सांगे ब्रम्हज्ञान वरी नाहीं प्रेम तें अंतरी ॥३॥
निळा म्हणे पोटभरु ।
उगेंचि करिती गुरुगुरु ॥४॥