पंढरिचे अनुष्ठान केलें चंद्रे – संत निळोबाराय अभंग – ३४८

पंढरिचे अनुष्ठान केलें चंद्रे – संत निळोबाराय अभंग – ३४८

पंढरिचे अनुष्ठान केलें चंद्रे ।
अलंकापुरी इंद्रें तपचर्या ॥१॥
तेथें इंदु निष्कलंक अंगें ।
तेथें आरोग्यभगें सुरेंद्रता ॥२॥
हरिहररुपें पंढरीरावो ।
येथें तिन्ही देवो सिध्दरुपें ॥३॥
निळा म्हणे तेथें भक्ती ।
येथें विरक्ती प्रगटली ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

पंढरिचे अनुष्ठान केलें चंद्रे – संत निळोबाराय अभंग – ३४८