संत निळोबाराय अभंग

धन्य धन्य पुंडलिका – संत निळोबाराय अभंग – ३४६

धन्य धन्य पुंडलिका – संत निळोबाराय अभंग – ३४६


धन्य धन्य पुंडलिका ।
केला तरणोपाय लोकां ॥१॥
एका दर्शनेंचि उध्दार ।
केलें पावन चराचर ॥२॥
चंद्रभागा पंढरपूर ।
भक्त आणि हरीहर ॥३॥
निळा म्हणे सुलभ केलें ।
भूमि वैकुंठ आणिलें ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धन्य धन्य पुंडलिका – संत निळोबाराय अभंग – ३४६

1 thought on “धन्य धन्य पुंडलिका – संत निळोबाराय अभंग – ३४६”

  1. Santosh Bhanushali

    बा पुंडलीका जगतावर तु हा मोठा उपकारच केलास की विषयोपभोगात आकंठ बुडालेल्या अज्ञानी जीवांचा उद्धार करण्यासाठी, हा भवसागर तरून जाण्यासाठी तरणोपाय म्हणून वैकुंठीची सावळी मूर्ती तु पंढरपुरात आणलीस म्हणून तु धन्य आहेस.
    जो जीव संतावर विश्वास ठेऊन पंढरपूरला येऊन फक्त ह्या पांडुरंगाचे दर्शन घेतो तो तत्क्षणी उद्धार पा्वतो.
    क्षेत्र पंढरपूर, तीर्थ चंद्रभागा, व दैवत विठ्ठल असा हा त्रिवेणी संगम आहे. ह्या संगमात स्नान करुन भक्त
    कृतकृत्य होतो. हर म्हणजे महादेव हे पंढरीचे आद्य वारकरी आहेत.एकदा वारीला खूप गर्दी झाल्यामुळें महादेवांनी माता पार्वतीला गावात , नंदीला मधेच व गणपतीला प्रवेशद्वारावर ठेवून भगवंताच्या दर्शनाला गेले , परंतु तिथेहि गर्दि झाल्याने पांडुरंगाने त्यांना डोक्यावर उचलून घेतले व म्हणून पांडुरंगाच्या डोक्यावर पिंडी आहे. हरिहराचा संगम ह्या मूर्तित असल्यामुळे हरिहराचे दर्शन होते. निळोबाराय भक्त पुंडलिकाचे आभार मानताना त्यांना धन्यवाद देतात व म्हणतात की तु लोकोद्धारासाठी ही सावळी मूर्ती वैकुंठावरुन आणलीस व पंढरपूरच वैकुंठ बनविलेस.
    रामकृष्णहरी ??????

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *