नेमूनियां ठेविलें जेथें । वसती तेथें ते देव ॥१॥ ऐसा समर्थ पंढरीनाथ । तो हा मोहित भक्तिसुखा ॥२॥ जेणें निर्मूनि पांचहि तत्वें । राखिलीं समत्वें निजआज्ञा ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हांडें भुवनें । स्वर्गे आनानें रचियलीं ॥४॥