धिक् त्याचें जन्मांतर । न देखे पंढरपुर महापापी ॥१॥ अहारे कर्मा बलवत्तरा । नेला अघोर भोगावया ॥२॥ नेदीचि उपजों विश्वास मनीं । पंढरी हे नयनीं देखावया ॥३॥ निळा म्हणे संग्रह होतां । पापाचा आईता उघडता तो ॥४॥