महर्षी देव स्तविती ज्यातें । कृतांजुळी हातें जोडूनियां ॥१॥ तो हा उभा विटेवरी । रम्य तीरीं चंद्रभागे ॥२॥ शुक नारद गाती कीर्तनीं । ज्यातें अनुदिनीं सुस्वरें ॥३॥ निळा म्हणे ब्रम्हादिक । ज्याचिये सेवक आझेचे ॥४॥