पाचारितांचि पंढरीनाथा । संचरे तत्वतां हदयांत ॥१॥ ऐसा प्रताप आणिकां अंगी । नाहीं ये युगीं विवरितां ॥२॥ संगतीं अन्यत्र दैवतें भूतें । आशा लोलिंगतें ते काय ॥३॥ निळा म्हणे जन्ममरणा । करी निवारणा एक हरि ॥४॥