पाचारितांचि पंढरीनाथा – संत निळोबाराय अभंग – ३४०
पाचारितांचि पंढरीनाथा ।
संचरे तत्वतां हदयांत ॥१॥
ऐसा प्रताप आणिकां अंगी ।
नाहीं ये युगीं विवरितां ॥२॥
संगतीं अन्यत्र दैवतें भूतें ।
आशा लोलिंगतें ते काय ॥३॥
निळा म्हणे जन्ममरणा ।
करी निवारणा एक हरि ॥४॥