मग चरणीं कवळुनियां करतळें – संत निळोबाराय अभंग ३४
मग चरणीं कवळुनियां करतळें ।
आफळुं गेला प्रचंड शिळें ।
तंव ते गर्जोनियां अंतराळें ।
गली निष्टोनी हातींची ॥१॥
घोषगर्जनें बोल गगनीं।
असुरा कंसा ऐक रे कानीं ।
तुझिया र्निमुळा लागुनी ।
चक्रपाणीं गोकुळीं वाढे ॥२॥
नंदयशोदेच्या घरीं ।
बाळकृष्ण बाळ ब्रह्मचारी ।
येउनी तो मथुरे भातरी ।
करील संहार असुरांचा ॥३॥
तुजसहित दैत्यबळी ।
मर्दुनी सांडील महीतळीं ।
ऐशी अक्षरें कर्णबिळीं ।
प्रविष्ट होताच कंसाच्या ॥५॥
रायें घातली लोळणी ।
अकस्मात पडियेला धरणीं।
मुगुट माथांचा उडोनी ।
गेला वदनीं धुळी भरे ॥
नेत्र झाले पांडुरवर्ण ।
कंठी बाष्प दाटला पूर्ण ।
प्राण सांडीत सेवकजन ।
सावध करिती विलापें ॥६॥
एक घालिती विंजणवारा ।
वदनीं प्रोक्षिती अंबुतुषारा ।
निळा म्हणे नावेक शरीरा ।
कंपही सुटला हरिधाके ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
मग चरणीं कवळुनियां करतळें – संत निळोबाराय अभंग ३४