भोळा माझा पंढरीनाथ । धांवें त्वरित पाचारिल्या ॥१॥ न पाहे मानप्रतिष्ठा त्याची । घेतली ज्याची सुति येणें ॥२॥ अनाथें दिनें भाविकें तें । आवडती चित्तें जीवापरी ॥३॥ निळा म्हणे पाळी लळा । अख्ंड सोहळा करुनियां ॥४