पुढारले विठ्ठल हरी । केली नगरी वैकुंठ ॥१॥ सुदर्शन ठेविलें तळीं । म्हणे कल्पजळीं बुडों नेदी ॥२॥ तैसेचि धरिले क्षेत्रावरी । म्हणती हे नगरी रक्षावी ॥३॥ निळा म्हणे या पुंडलिकें । यापरी लोकें उध्दरिलीं ॥४॥