पुंडलिकें शेत केलें । पिकविलें अपार ॥१॥ संवगिता नावरे एका । मग सकळ लोकां हांकारी ॥२॥ या रे म्हणे बांधा मोटा । करा सांठा न्या घरा ॥३॥ निळा म्हणे कल्पवरी । लुटती परी सरेना ॥४॥