नाहीं विश्वास जया गाठीं । न पाहती दिठीं पंढरी ते ॥१॥ अदृष्ट त्यांचे हीन झालें । न देखती पाउलें विटेवरी ॥२॥ लक्ष चौर्यांशीं यातना भोग । सोशिती अभंग दैन्यवाणें ॥३॥ निळा म्हणे नाडले वायां । दुर्लभ पावोनियां नरदेह ॥४॥