ऐसिया सुखाची मांदूस – संत निळोबाराय अभंग – ३३३

ऐसिया सुखाची मांदूस – संत निळोबाराय अभंग – ३३३

ऐसिया सुखाची मांदूस ।
झाली रुपस विठाई ॥१॥
मांडूनियां इटे ठाण ।
धरिला जघन व्दयकरीं ॥२॥
रुपाकृती मानववेष ।
ईशाईश जननी हे ॥३॥
निळा म्हणे भक्तांसाठीं ।
फिरे वाळवाटीं ।
उघडी हे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसिया सुखाची मांदूस – संत निळोबाराय अभंग – ३३३