एकंदर देवें आज्ञा – संत निळोबाराय अभंग – ३३१

एकंदर देवें आज्ञा – संत निळोबाराय अभंग – ३३१

एकंदर देवें आज्ञा केली ।
पुंडलिका दिधली निजभाक ॥१॥
जे जे तुझिया क्षेत्रासी येती ।
त्यां त्यां उत्तम गति पाठवीं ॥२॥
उत्तम अधम न म्हणे कांही ।
रिगमचि नाहीं दोषा येथें ॥३॥
निळा म्हणे हे पंचकोशी ।
जाणा वाराणसीसमान ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

एकंदर देवें आज्ञा – संत निळोबाराय अभंग – ३३१