उमटलीं विष्णूपदें – संत निळोबाराय अभंग – ३३०

उमटलीं विष्णूपदें – संत निळोबाराय अभंग – ३३०


उमटलीं विष्णूपदें ।
गयावर्जनीं जे प्रसिध्दें ॥१॥
नारद क्षेत्रीं पंढरपुरीं ।
अदभुत पदांची त्या थोरी ॥२॥
ऋणत्रया मुक्त जन ।
देतां पदीं पिंडदान ॥३॥
निळा म्हणे गोपाळपुरीं ।
विठ्ठल वेणुवादन करी ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

उमटलीं विष्णूपदें – संत निळोबाराय अभंग – ३३०