श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी – संत निळोबाराय अभंग ३३

श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी – संत निळोबाराय अभंग ३३


श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी ।
वसुदेवातें दैन्‍य अवदसा वरी ।
मग देवकीजवळी देतां ते कुमरी ।
महाआक्रोशें गर्जिन्नली ॥१॥
ऐकूनि कंस भयचकित ।
असुरसैन्यक भयें कांपत ।
सेवक धांवोनि रायते म्हणत ।
जन्मला सुत देवकिये ॥२॥
महाकाळ कृतांत ऐसा ।
गर्जे ब्रम्हांड कोंदल्या दिशा ।
राज म्हणे हा आमुच्या वंशा ।
निर्दाळील निश्चयें आठवा ॥३॥
घेऊनियां मग निशाचरभारा ।
आला बंदिशाळे सत्वरा ।
सावध करिताती येरयेरां ।
म्हणती विकळ जाऊं नका ॥४॥
भयभीत देवकींते हाकारी ।
म्हणे आठवा आणि वो बाहेरी ।
येरी करुणा भाकूनियां भारी ।
विनवि येवडे तरी वाचवा ॥५॥
ऐसे बोलोनियां सुंदरी ।
आणोनि दिधली कौसा करी ।
येरु पाहे तव तव कुमारी ।
म्हणे आठवा लपविला ॥६॥
तोहि आणेनियां देई ।
येरी म्हणे दुसरें नाही ।
झाडा घेऊनियां पाहीं ।
आण तुझीचि वाहतसें ॥७॥
येरु म्हणे ईतें सोडूं ।
मग तयाचाहि सूड काढू ।
निळा म्हणे गर्वारुढू ।
नेणे मदांध हरि महिमा ॥८॥


राम कृष्ण हरी आपणास या भंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

श्रीकृष्ण सांडूनि जातांचि दुरी – संत निळोबाराय अभंग ३३