उमटलीं खडकावरी । पदें गोजिरीं विष्णूचीं ॥१॥ देखोनियां ते सात्विक जन । करिती पिंडदान तये पदीं ॥२॥ पंढरिये नारदाश्रमीं । भीमासंगमी पुष्पावती ॥३॥ निळा म्हणे दक्षिण गया । उध्दरावया पूर्वजा ॥४॥