उमटलीं खडकावरी – संत निळोबाराय अभंग – ३२९
उमटलीं खडकावरी ।
पदें गोजिरीं विष्णूचीं ॥१॥
देखोनियां ते सात्विक जन ।
करिती पिंडदान तये पदीं ॥२॥
पंढरिये नारदाश्रमीं ।
भीमासंगमी पुष्पावती ॥३॥
निळा म्हणे दक्षिण गया ।
उध्दरावया पूर्वजा ॥४॥
उमटलीं खडकावरी ।
पदें गोजिरीं विष्णूचीं ॥१॥
देखोनियां ते सात्विक जन ।
करिती पिंडदान तये पदीं ॥२॥
पंढरिये नारदाश्रमीं ।
भीमासंगमी पुष्पावती ॥३॥
निळा म्हणे दक्षिण गया ।
उध्दरावया पूर्वजा ॥४॥