आत्मा सकळांचा श्रीहरी । तो हा उभा पंढरपुरीं ॥१॥ म्हणेनियां देव येती । दर्शनी ऋषींच्या पंगती ॥२॥ प्रतिवर्षी उपासक । येती यात्रे सनकादिक ॥३॥ निळा म्हणे त्रैलोक्यदाता । विठो लक्ष्मीचा भर्ता ॥४॥