आत्मा सकळांचा श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – ३२८
आत्मा सकळांचा श्रीहरी ।
तो हा उभा पंढरपुरीं ॥१॥
म्हणेनियां देव येती ।
दर्शनी ऋषींच्या पंगती ॥२॥
प्रतिवर्षी उपासक ।
येती यात्रे सनकादिक ॥३॥
निळा म्हणे त्रैलोक्यदाता ।
विठो लक्ष्मीचा भर्ता ॥४॥
आत्मा सकळांचा श्रीहरी ।
तो हा उभा पंढरपुरीं ॥१॥
म्हणेनियां देव येती ।
दर्शनी ऋषींच्या पंगती ॥२॥
प्रतिवर्षी उपासक ।
येती यात्रे सनकादिक ॥३॥
निळा म्हणे त्रैलोक्यदाता ।
विठो लक्ष्मीचा भर्ता ॥४॥