आतां पाहेन वाडेंकांडें – संत निळोबाराय अभंग – ३२७
आतां पाहेन वाडेंकांडें ।
याचें रुपढे दृष्टीभरी ॥१॥
आहे उभा ईटेवरी ।
न वजे पंढरी सांडूनियां ॥२॥
येती त्यांसी आलिंगन ।
पाववी देऊन संतोषा ॥३॥
निळा म्हणे दासांप्रती ।
वाटितो मुक्ति दर्शनें ॥४॥
आतां पाहेन वाडेंकांडें ।
याचें रुपढे दृष्टीभरी ॥१॥
आहे उभा ईटेवरी ।
न वजे पंढरी सांडूनियां ॥२॥
येती त्यांसी आलिंगन ।
पाववी देऊन संतोषा ॥३॥
निळा म्हणे दासांप्रती ।
वाटितो मुक्ति दर्शनें ॥४॥