यमुनेचा जो विहारीं । तोचि हा उभा पंढरपुरीं ॥१॥ दह्या-दुधाचा सुकाळ । कार्तिकीये पर्वकाळ ॥२॥ नवनिताचे गोळे । क्षीरामृताचे कल्लोळे ॥३॥ निळा म्हणे अंळकार । वस्त्रें मिरवी रमावर ॥४॥